suvichar

दूर करा वास्तु दोष

वास्तूचे महत्त्व आपल्या जीवनात बरेच असल्याने या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वास्तुदोष असल्यामुळे जीवनात अनेक संकटे येतात. या संकटांने घराची सुख-शांती भंग होते. त्यामुळे वास्तुत काही परिवर्तन करून वास्तु दोषापासून आपण मुक्त होऊ शकतो.

* झोपण्याच्या खोलीत उष्टे भांडे ठेवल्याने घरातील महिलेच्या तब्बेतीवर प्रतिकूल परिणाम होतो व क्लेश होतात.
* शयनकक्षात पाणी किंवा जड वस्तू ठेवणे वर्ज्य आहे.
* पायरीच्या खाली बसून कोणतेही कार्य करू नये.
* कुठल्याही दारात अडसर नसावा.
* प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मीचा अपमान होतो.
* कोर्ट कचेरीची फाइल मंदिरात ठेवल्याने खटला जिंकण्यास मदत होते.
* दिवंगतांचे फोटो नेहमी दक्षिणेकडे लावायला पाहिजेत. घरातील घड्याळ मंदगतीने चालत असेल तर गृहस्वामीच्या भाग्यात अडथळा उत्पन्न होतो.
* पलंग कधीही भिंतीला लागून ठेवू नये. त्याने नवरा-बायकोत भांडणे होतात.
* घरातील व्यक्ती बर्‍याच दिवसापासून आजारी असेल तर नैऋत्य कोपर्‍यात (दक्षिण-पश्चिम) त्याला झोपवायला पाहिजे. ईशान्य कोपर्‍यात पाणी ठेवल्याने रोगी लवकर बरा होतो.
* घराच्या प्रवेशद्वारात काळ्या घोड्याची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ती, आत व बाहेर गणपती किंवा दक्षिणमुखी दारावर हनुमानाचे चित्र किंवा भैरव यंत्र लावून त्याचा फायदा घेऊ शकता. हे लावल्याने भूतबाधा होत नाही.
* औषध-गोळ्या नेहमी ईशान्य कोपर्‍यात ठेवायला पाहिजे. औषध घेताना तोंडसुद्धा त्याच कोपर्‍यात असावे. त्याने
रोगी लवकर बरा होतो.
* एखादे घर एस आकारावर असेल तर ते फारच शुभ असते.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

खंडोबाची आरती जय देवा खंडेराया निजशिवरुप सखया आरती ओवाळीतो

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments