Festival Posters

वास्तु दोषावर करा मात

घर खरेदी करण्‍यापूर्वी किंवा बांधण्‍यापूर्वी वास्तुशास्त्राचे काही न‍ियम लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तुत काही दोष राहिल्यास आपल्यामागे आयुष्यभरासाठी संकटाची मालिका लागू शकते. जीवनात वारंवार येणार्‍या अडचणी प्रगतीला बाधक ठरतात. घरातील सुख-शांती हिरावून घेतात. म्हणूनच घर, दुकान किंवा कार्यालय बांधण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहेत.

* घराच्या बैठक खोलीत खरकटी भांडी ठेवल्याने घरातील प्रमुख महिलेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. कुटूंबातील सदस्यांचे आपसात जमत नाही.

* बैठकीच्या खोलीत पाण्याने भरलेली वस्तू ठेवू नये.

* बैठकीच्या खोलीत ‍वैयक्तिक किंवा मित्रांसोबत व्यसन करणे प्रगतीला बाधा उत्पन्न करू शकते.

* घरातील जिन्याखाली बसून कोणतेच चांगले काम करू नका.

* घराच्या प्रवेशद्वारसमोर कोणत्याच प्रकारचा अडथळा ठेवू नका.

* प्रवेशद्वाराच्या दिशेने पाय करून रात्री झोपू नका. तसे केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो.

* न्यायालयाची फाईल देवघरात ठेवल्याने दावा आपल्या बाजूने लागण्यास मदत होते.

* स्वर्गवासी स्वजनांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला लावले पाहिजे. घरातील घड्याळे कधी बंद पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण घरात बंद पडलेली घड्याळी घराची घडी विस्कळीत करतात.

* घरातील पलंग कधीच भिंतीला खेटून ठेवू नका. तसे केल्यास पत्नी-पतीमध्ये दरी निर्माण होते.

* तीन रस्त्यांवर घर असणे अशुभ असते. अशा घरातील दोष दूर करण्‍यासाठी घराच्या चारही भिंतीला आरसा लावावा.

* घरात एखादा सदस्य नेहमी आजारी पडत असेल तर त्याला घराच्या नैऋत्य कोपर्‍यात झोपवले पाहिजे. ईशान्य कोपर्‍या पाणी ठेवल्याने अधिक लाभ होतो.

* घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याच्या पायाची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ति, आत बाहेर श्री गणपतीची प्रतिमा तसेच दक्षिणमुखी द्वार असेल तर हनुमानाची प्रतिमा किंवा भैरव यंत्र लावल्याने घरातील दोष दूर होतात.

* औषधे नेहमी ईशान्य कोपर्‍यात ठेवली पाहिजे. औषधे घेतानाही तोंड ईशान्य दिशेनेच पाहिजे. असे केल्याने औषधांचा प्रभाव तत्काळ जाणवतो.

सर्व पहा

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

घरात पीडा येईल.. जर गुरुवारी ही 7 कामे करत असाल तर थांबवा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

Show comments