Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

Updated: शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (19:56 IST)
 
आवळा मुरंबा-  
साहित्य- 
500 ग्रॅम आवळे 
10 ग्रॅम चुना
25 ग्रॅम साखर कँडी
600 ग्रॅम साखर
1 चमचा मिरे पूड 
5-7 केशर
1/4 चमचा वेलची पूड 
 
कृती-
आवळा मुरंबा बनवण्यासाठी सर्वात आधी ताजे आवळे घ्यावे व पाण्यामध्ये तीन दिवस भिजत घालावे. आता त्यांना पाण्यामधून बाहेर काढल्यानांतर त्यांना काटेरी चमच्याने टोचून घ्यावे. आता पाण्यामध्ये चुना घोळून त्यामध्ये हे आवळे परत तीन दिवस भिजत घालावे. आता नंतर हे आवळे पाण्यामधून काढून त्यांना खडीसाखरेचा पाण्याची वाफ द्यावी. आता हे आवळे एक कपड्यावर पसरवून वाळवून घ्यावे. आता साखरेचा पाक बनवून त्यामध्ये हे आवळे सोडावे आणि शिजवून घ्यावे. आता आवळे शिजल्यानंतर त्यामध्ये काळेमिरे पूड, केसर आणि वेलची पूड घालावी. त्यानंतर हा मुरंबा थंड करून काचेच्या बरणीमध्ये भरावा. तर चला तयार आहे आपली आवळ्यापासून मुरंबा रेसिपी. 
 
भरवा आवळा लोणचे-
साहित्य-
1 किलो आवळे 
100 ग्रॅम मोहरी 
100 ग्रॅम मोहरीची डाळ 
100 ग्रॅम तिखट 
अर्धा चमचा हळद 
25 ग्रॅम बडीशोप 
चिमूटभर हिंग 
500 ग्रॅम गोडे तेल 
 
कृती-
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. व पुसून घ्यावे. आता एका पातेलीमध्ये हे आवळे ठेवावे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालावे. व मंद आचेवर शिजवून घ्यावे. आता हे आवळे थंड करून घ्यावे.आता या आवळ्यामधील बिया वेगळ्या कराव्या. आता कढईत तेल गरम करून तेल थंड होऊ द्या. या तेलात वरील सर्व मसाले घालून परतवून घ्या. ते पूर्णपणे थंड झाल्यावर चमच्याच्या मदतीने आवळ्यामध्ये मसाले भरून बरणीत ठेवा व बरणी बंद करा. तर चला  चटपटीत भरलेले आवळा लोणचे तयार आहे.
 
मसालेदार आवळा लौंजी-
साहित्य-
250 ग्रॅम आवळा
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
1 चमचा तिखट
1/4 चमचा हळद
चिमूटभर हिंग
2 चमचे धणे
1 चमचा बडीशेप
1चमचा मोहरी
चवीनुसार मीठ
तेल 
 
कृती-
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून २-३ शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यावे. तसेच हे आवळे थंड झाल्यावर यामधून बिया वेगळ्या करून घ्यावा. आता हे आवळे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. आता  कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे. आता त्यात हिंग, बडीशेप आणि चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता मॅश केलेले आवळे घालावे.व त्यातील पाणी आटू द्यावे. नंतर वरील मसाला साहित्य घालून चांगले मिक्स करावे व थोडा वेळ मंद आचेवर षिजवावे. आवळा लौंजी तेल सोडू लागल्यावर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली आवळा लौंजी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Rakshabandhan Special शाही आणि चवदार मिठाई पाककृती ''काजू चकली''

पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नका! किरकोळ वाटणाऱ्या दुखण्यामागे असू शकतात या ५ गंभीर समस्या

BHEL Apprentice Recruitment : BHEL मध्ये १०वी-आयटीआय उमेदवारांना ३८० पदांसाठी संधी, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा; त्वचेच्या टोननुसार योग्य प्रोडक्ट्स निवडा

वजन कमी करण्यासाठी नारळाचे पाणी प्या; शरीराला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments