पौष्टिक पालक डोसा रेसिपी  
					
										
                                       
                  
                  				  साहित्य-
	डोसा बॅटर- एक कप 
	पालक- एक काप कापलेला 
	हिरवी मिरची- दोन कापलेली 
	आले-एक इंच 
				  													
						
																							
									  
	जिरे- अर्धा चमचा 
	मीठ-चवीनुसार 
	तेल
	 
	कृती-
	सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून उकळवून घ्यावा. नंतर तो थंड करण्यास ठेवावा. व आता या पालकाची पाणी, आले, मिरची घालून पेस्ट बनवा. आता डोसा बॅटरमध्ये तयार पालक पेस्ट घालावी. आता या मिश्रणात मीठ आणि जिरे घालून मिक्स करावे. आता तवा गरम करून त्यावर थोडे तेल घालावे. तव्यावर पीठ घालून डोसा बनवून घ्यावा. डोसा मंद आचेवर शेकावा. वरून काही थेंब तेल टाका जेणेकरून डोसा कुरकुरीत होईल. तर चला तयार आहे आपला पालक डोसा, जो चवीला देखील स्वादिष्ट तर लागतोच पण आरोग्याच्या दृष्टीने देखील पौष्टीक आहे. नारळाची चटणी किंवा सांबार बरोबर गरमागरम सर्व्ह करू शकतात. 
				  				  
	
		अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
		 
		Edited By- Dhanashri Naik