शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)

नाश्त्यासाठी बनवा ओट्स इडली

साहित्य-
दोन  कप ओट्स
अर्धा लिटर दही हलके आंबट 
एका  चमचा मोहरी
एका चमचा  उडीद डाळ
एक चमचा हरभरा डाळ
अर्धा चमचा तेल
दोन चमचे हिरवी मिरची बारीक चिरलेली
एक कप गाजर किसलेले
दोन चमचे कोथिंबीर चिरलेली
अर्धा चमचा हळद 
चवीनुसार मीठ
चिमूटभर इनो 
 
कृती-
एका तव्यावर ओट्स भाजून घ्यावे.यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, उडदाची डाळ आणि चणा डाळ भाजून घ्यावी. आता यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेले गाजर आणि हळद घालावी. आता हे मिश्रण ओट्स पावडर मध्ये दही सोबत घालावे. व चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तसेच चिमूटभर इनो घालावे. यामध्ये पाण्याचा वापर करू नये. आपले इडलीचे मिश्रण तयार आहे. आता इडली पात्रातील साच्याला तेल लावावे व त्यामध्ये हे मिश्रण भरावे. 15 मिनिट पर्यंत शिजवल्यानंतर एका प्लेटमध्ये इडली काढून घ्यावी. तसेच चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik