Dharma Sangrah

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

Updated: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (22:28 IST)
 
सारणासाठी -
पाव कप किसलेली पान कोबी, 1 /2 कप कुस्करलेले पनीर,2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /2 लहान चमचा आमसूल पूड, मीठ चवीप्रमाणे,तेल.
 
कृती -
 
कणीक मळण्यासाठी -
एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. तूप आणि चवीपुरती मीठ घाला लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या. कणीक मऊसर मळावी चिकट नसावी. आता 10 ते 15 मिनिटे कणीक झाकून  ठेवा.  
 
सारणासाठी -
किसलेली पान कोबी एका भांड्यात काढून घ्या त्यात कुस्करलेले  पनीर, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, मीठ आणि आमसूल पूड घाला. सर्व साहित्य हाताने एकत्र करून मिसळून त्याचे लहान लहान गोळे करून ठेवा.
 
आता कणकेच्या लहान लहान लाट्या करा. आणि त्या लाटींना पुरीच्या आकाराच्या लाटून घ्या .त्या पुरी मध्ये सारण भरा आणि त्यावर  एक अजून पुरी ठेवा आणि कडेला पाण्याचा हात लावून कडे बंद करा जेणे करून सारण बाहेर निघू नये. 
 
नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यावर कोबी-पनीर पराठा घाला. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. आता या पराठ्याला तेल लावून दोन्ही बाजूने शेकून घ्या मंद आचेवर शेकायचं आहे. चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम कोबी-पनीर पराठा दह्यासह सर्व्ह करा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

वजन मोजण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या वजन मोजण्याची योग्य वेळ आणि महत्त्वाच्या टिप्स

B.Tech in Leather Engineering Technology मध्ये करिअरची संधी; पात्रता, शीर्ष महाविद्यालये, व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments