शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:58 IST)

गाजराचे लोणचे

सामुग्री- अर्धा किलो गाजर, १५० ग्रॅम मोहरीचे तेल, १ टेबलस्पुन आलं आणि लसूण (बारीक चिरलेले), गरम मसाला आणि लाल‍ तिखट चवीप्रमाणे, २ कप बारीक चिरलेला गुळ, व्हिनेगर, २ चमचे मोहरीची डाळ, अर्धा कप मीठ
 
कृती-
गाजर धुवुन बारीक चिरून घ्या. आता तेल गरम करा त्यात आलं-लसूण टाका, सोनेरी रंग आल्यानंतर चिरलेले गाजर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ, आणि बारीक केलेला गुळ आणि १ चमचा व्हिनेगर टाकावा. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा. लोणचे पूर्णपणे तेलात बुडालेले असावे.