1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (10:50 IST)

हिवाळा विशेष : हरियाली टिक्की

haryali tikki recipe
साहित्य -
4 उकडलेले बटाटे, 100 ग्रॅम पालक, ¾ कप हिरवे मटार, 2  हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 लहान चमचा तिखट, ¼लहान चमचा चाट मसाला, ½ लहान चमचा गरम मसाला,¼लहान चमचा कोर्नफ्लोर, 1 मोठा चमचा तेल, मीठ. 
 
कृती -
पालकाचे देठ काढून त्याला धुऊन आणि कपड्याने पुसून घ्या. पालक बारीक चिरून घ्या. मटार धुऊन एक कप पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखर घालून उकळवून घ्या. साखर आणि मीठ घातल्याने मटारचा रंग हिरवागार राहतो. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. उकडलेले मटार थोड्या वेळ चाळणीवर ठेवून द्या. पाणी निघाल्यावर मटार मॅश करून घ्या. तसेच बटाटे देखील उकडवून मॅश करून घ्या. आता एका नॉनस्टिक कढईत मध्यम आंचे वर तेल गरम करण्यासाठी ठेवा. या मध्ये हिरव्या मिरच्या आणि आलं घालून परतून घ्या. चिरलेला पालक घाला आणि 2-3  मिनिटासाठी मध्यम आंचेवर परतून घ्या. मॅश केलेली मटार घालून 2 मिनिटे परतून घ्या.

पालक आणि मटार थंड झाल्यावर मॅश केलेले बटाटे,कोथिंबीर आणि सर्व मसाले घालून मिसळा. नंतर कोर्नफ्लोर घाला आणि मिसळा. आता हाताने मळून लहान 12 गोळे बनवा आणि हळुवार पणे हाताने टिक्कीचा आकार घ्या. एक नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर थोड्या तेलात या टिक्की दोन्ही कडून तपकिरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. चविष्ट आणि पौष्टिक हरियाली टिक्की खाण्यासाठी तयार. टिक्की हिरव्या चटणी आणि सॉस सह सर्व्ह करा.