शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (20:00 IST)

घरीच बनवा रेस्टॅरेंट सारखी बटर नान

भाजी कितीही चविष्ट असेल नान रोटी शिवाय रेस्टॅरेंट सारखी मज्जा वाटत नाही. ज्यामुळे घरातील जेवण्याला ती चव येत नाही पण सारखे बाहेर जाऊन खाणे देखील शक्य नसते तर आपण घरीच रेस्टॅरेंट सारखी बटर नान बनवून जेवण्याचा आस्वाद घेऊ शकता. या साठी आपल्याला तंदूर किंवा ओव्हन ची गरज देखील लागणार नाही तसेच फुगलेली नान रोटी देखील बनेल आणि तेही अंडीचा वापर न करता. चला तर मग चविष्ट बटर नान बनविण्यासाठीचे साहित्य आणि कृती. 
 
साहित्य -
1 किलो मैदा, दीड चमचे ड्राय यीस्ट, 2 मोठे चमचे पिठी साखर, 1 मोठा चमचा मीठ, 2 कप दही, दीड कप कोमट पाणी.
 
कृती - 
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या. मैद्यात यीस्ट, पिठी साखर आणि मीठ घालून मिसळून घ्या. या मध्ये दही घाला, पाणी कोमट करून घालून मऊसर कणीक मळून घ्या. आता या कणकेला किचन कट्ट्यावर मैदा भुरभुरून किमान 10 मिनिटे मळून घ्या. चांगल्या प्रकारे मळून झाल्यावर या कणकेला 2 तासासाठी भांड्यात घालून बाजूला ठेवून द्या. दोन तासानंतर आपण बघाल की कणीक फुगली आहे. या वर पुन्हा मैदा घालून मळून घ्या. या कणकेच्या गोळ्या बनवा किंवा सुरीच्या साहाय्याने 16 गोळ्या बनवून घ्या. असं केल्याने सर्व नान एक सारख्या बनतील आणि सर्व्ह करायला देखील चांगले होईल. 
 
आता एक गोळी घेऊन त्याला पोळी सारखे लाटून घ्या, जास्त पातळ नसावी. मंद आचेवर तवा किंवा पॅन ठेवून लाटलेली पोळी तेल न लावता दोन्ही बाजूने शेकून घ्या. ताटलीत नान ठेवून वरून लोणी लावा. बटर नान रोटी किंवा पोळी तयार आहे. आवडत्या भाजीसह सर्व्ह करा.