रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (09:47 IST)

चटपटीत आणि चविष्ट मटार कचोरी

हिवाळ्यात बऱ्याच वेळा संध्याकाळी काही चमचमीत चटपटीत खावेसे वाटते. पण प्रश्न असा पडतो की काय खावं की जे आरोग्यवर्धक होण्यासह चविष्ट असेल. या साठी आम्ही सांगत आहोत चविष्ट मटार कचोरी. जे खाण्यात चविष्ट आहे आणि बनवायला देखील सोपी आहे चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती .
 
साहित्य- 
2  कप गव्हाचं पीठ किंवा मैदा, 2 चमचे तेल, मीठ चवीप्रमाणे, 1 कप हिरवी मटार, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा जिरे, 1 चमचा धण्याची पूड, 1/2 चमचा बडी शोप, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा आमसूल पूड,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, तळण्यासाठी तेल. 
 
कृती - 
एका भांड्यात गव्हाचं पीठ घेऊन कणीक मळून घ्या. या पीठाला सेट होण्यासाठी 20 मिनिटे बाजूला ठेवा. सारण तयार करण्यासाठी मटार दरीदरीत वाटून घ्या. पॅन मध्ये तेल गरम करा त्या मध्ये हिंग आणि जिरे घाला जिरे तपकिरी झाल्यावर धणेपूड, बडीशेप, हिरव्या मिरच्या आलं घालून परतून घ्या. या मध्ये मटार पेस्ट घाला. तिखट, गरम मसाला, आमसूल पूड, कोथिंबीर आणि मीठ घालून मटार 3 ते 4 मिनिट परतून घ्या. सारण तयार आहे.
 
कणकेची लिंबाच्या आकाराची गोळी बनवा त्याला हातावर घेऊन मध्ये सारण भरा. आकाराला वाढवा आणि लाटून घ्या. अशा प्रकारे सर्व कचोऱ्या तयार करा. कढईत तेल घालून गरम करून कचोऱ्या सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. तळलेल्या कचोऱ्या पेपर नेपकीन वर काढून घ्या. गरम कचोऱ्या सॉस किंवा हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.