वेज मोमोज
साहित्य : 2 कप मैदा, 1/2 कप पत्ता कोबी, 1/2 कप कांदा किसलेला, 1/4 कप किसलेली सिमला मिरची, 1 चमचा मीठ, 1/4 चमचा ओवा, 1 चमचा तेल.
कृती : मैद्यात 1/2 चमचा मीठ, तेल आणि ओवा घालून मठरीप्रमाणे गोळा तयार करावा. पत्ता कोबी, कांदा आणि सिमला मिरचीत उरलेले मीठ आणि ओवा घालावा. कणकेचे लहान लहान गोळे करून हाताने चपटे करावे. नंतर त्यात 1 चमचा तयार मिश्रण भरून चारीकडून मोदकाप्रमाणे आकार द्यावा. इडलीच्या पात्रात 15-20 मिनिट मंद आचेवर ठेवून उकळावे. नारळ व कोथिंबिरीची चटणीसोबत सर्व्ह करावे.