1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (12:54 IST)

बनवा बनाना कप केक

जास्त पिकलेली केळी खायला नको वाटते. मग ही केळी कचर्यांच्या डब्यात जातात. पण आता पिकलेली केळी फेकून द्यायची गरज नाही. याच केळ्यांपासून मस्तपैकी बनाना कप केक तयार करता येईल.
 
साहित्य : दोन पिकलेली केळी, एक कप रवा, दोन चमचे दही, दोन चमचे तेल, अर्धा कप साखर, एक छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा वेलची पूड, थोडे टूटीफ्रूटी.
 
कृती : पिकलेल्या केळ्यांची सालं काढून केळी नीट कुस्करून घ्या. दुसर्याट भांड्यात रवा घेऊन त्यात दही घाला. (रव्याऐवजी मैदा किंवा गव्हाचे पीठही वापरता येईल.) रवा आणि दह्याच्या मिश्रणात तेल घाला. मग साखर घाला. केळीही गोड असतात. त्यामुळे साखर चवीनुसार घाला. या मिश्रणात वेलची पूड घाला. मग पाणी घालून मिश्रण फेटून घ्या. शेवटी यात कुस्करलेली केळी घालून मिसळून घ्या. सजावटीसाठी वरून टुटीफ्रूटी घाला. हे मिश्रण 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या. आता यात बेकिंग सोडा घाला. जाड बुडाच्या कढईत मीठ घालून पसरवून घ्या. कढई गॅसवर ठेवा. मीठ गरम करून घ्या. यावेळी कढईवर झाकण ठेवा. पॅन केकच्या साच्याला थोडे तेल लावून घ्या. मग केकचे मिश्रण त्यात घाला. कप केकचे साचे नसल्यास वाट्यांचा वापर करता येईल. कढईमध्ये ताटली ठेवा. त्यावर केकचे साचे किंवा वाट्या ठेवा. वरून झाका. साधारण 25 ते 30 मिनिटे मंद आचेवर शिजूद्या. चमचा किंवा सुरीने केक तयार झाल्याची खात्री करून घ्या. केक थंड होऊ द्या. कुटुंबासोबत बसून या केकचा आस्वाद घ्या.
मधुरा