शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: रविवार, 19 जुलै 2020 (17:27 IST)

श्रावण विशेष : उपवासात बनवा चविष्ट पनीर कटलेट, वाचा सोपी विधी

साहित्य : 250 ग्राम ताजे पनीर, 1/2 कप शिंगाड्याचे पीठ, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, सेंधवमीठ चवीप्रमाणे.
 
कृती : पनीर कटलेट बनविण्यासाठी सर्वात आधी पनीराला किसून घ्या. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. आता शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या आणि त्यामध्ये किसलेले पनीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिसळून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्याचे इच्छित आकाराचे कटलेट बनवून घ्या. आता तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या. तयार कटलेट हिरवी चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करा.