ganesh chaturthi

Easy Chutney Recipes: चविष्ट चटण्या, उन्हाळ्यात जेवण्याचा स्वाद वाढवतील

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (22:26 IST)
 
आमसूल चटणी 
साहित्य : 2 मोठे चमचे आमसूल भुकटी (पावडर), 1 चमचा गूळ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजके जिरे, काळं मीठ चवीप्रमाणे, चिमूट भर हिंग, तेल, मीठ आणि पाणी.
कृती : सर्वप्रथम गुळाला पाण्यामध्ये विरघळून घ्या. यात आमसूल पावडर टाकून मिसळून घ्या. एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. यात जिरे, हिंग, लाल तिखट आणि आमसुलाची केलेली पेस्ट टाका आणि शेवटी मीठ घालून गरम करा. ही पेस्ट घट्ट झाल्यावर गॅस वरून काढून घ्या. आमसुलीची चविष्ट चटणी तयार. आपल्या चवीनुसार आपण यात मीठ किंवा गूळ वाढवू शकता.
फायदा : उन्हाळ्याच्या दिवसात ही चटणी थंड असल्यामुळे चविष्ट लागते. ही चटणी कोणत्याही प्रकाराचे नुकसान करत नाही. ही चटणी खाल्ल्यावर आपल्याला सर्दी किंवा घसा खराब होण्यासारखे त्रास होणार नाही. ही पचनासाठी तसेच पोटाच्या समस्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे.
 
लिंबाची आंबट गोड चटणी 
साहित्य : 4 लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट, एक लहान चमचा जिरे, अर्धा चिमूट हिंग, दोन चिमूट काळं मीठ, मीठ आणि साखर चवीप्रमाणे.
कृती : सर्वप्रथम लिंबाचे बियाणे काढून लिंबाचे लहान लहान तुकडे करावे. आता लिंबाच्या तुकड्यांना सर्व साहित्य घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. लिंबाची आंबट गोड चटणी तयार आहे. या चटणीला आपण पोळी-भाजी, तसेच चविष्ट पदार्थांबरोबर सुद्धा खाऊ शकता.
फायदा : इच्छा असल्यास आपण लिंबाची ही चटणी नियमाने घेऊ शकता. ह्यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल. लिंबाची ताजी चटणी खाऊन पोट आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला व्हिटॅमिन सी देखील मिळेल.
 
कैरीची आंबट गोड चटणी
साहित्य : 3 कैऱ्या, 1 कांदा, 50 ग्राम पुदिना, अर्धा लहान चमचा जिरे, गूळ चवीप्रमाणे, अर्धा लहान चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे.
कृती : कांदा आणि कैरीचे बारीक काप करावे. वरील सर्व साहित्य घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि गुळाचे प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता. कैरीची चटणी तयार.
फायदा : कैरीची चटणी नियमाने खाल्ल्याने जेवणात चव तर वाढवतेच त्याचबरोबर या मधील व्हिटॅमिन सी, ए आणि बी देखील मिळते. ह्याचा सेवनाने उन्हाळ्याच्या दुष्प्रभाव पासून वाचता येऊ शकेल. हे पोट आणि पचनाच्या समस्येसाठी फायदेशीर आहे. या शिवाय आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि नव्या पेशी तयार करण्यास सुद्धा मदत होते. 
 
चिंचेची चटणी 
साहित्य : 1 वाटी चिंच, पाणी गरजेप्रमाणे, चिमूट भर हिंग, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे काळं मीठ, मीठ चवीप्रमाणे, लाल तिखट चवीप्रमाणे.
कृती : चिंचेला कोमट पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवा. ह्या मधील बियाणे काढून घ्या. गूळ आणि सर्व साहित्ये घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे सर्व मिश्रण उकळून घ्या. याला जिऱ्याची फोडणी द्यावी. चिंचेची चटणी तयार आहे. आपल्याला इच्छा असल्यास पातळ करून पन्हे सुद्धा करू शकता. 
फायदा : उन्हाळ्यात चिंचेची चटणी किंवा पन्हं उष्णतेच्या प्रभावाला कमी करतं. या व्यतिरिक्त पचण्यास हे फायदेशीर आहे. उलटी होणे, मळमळणे आणि जुलाब सारख्या त्रासासाठी फायदेशीर आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments