Dharma Sangrah
✕

सर्वांना आवडेल अशी 'हॉटेल स्टाईल' कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी खास रेसिपी

Updated: बुधवार, 6 मे 2026 (12:34 IST)
साहित्य-
कोथिंबीर: २ कप (बारीक चिरलेली आणि धुतलेली)
बेसन: १ ते १.५ कप
तांदळाचे पीठ: १/४ कप (यामुळे वडी जास्त कुरकुरीत होते)
मसाले: १ चमचा आले-लसूण-मिरची पेस्ट, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.
इतर: २ चमचे पांढरे तीळ, चिमूटभर हिंग आणि तळण्यासाठी तेल.

कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेली कोथिंबीर घ्या. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, आले-लसूण पेस्ट आणि सर्व सुके मसाले टाका. कोथिंबीर धुतल्यानंतर तिला पाणी सुटते, त्यामुळे आधी पाणी न घालता मळा. गरज वाटल्यास अगदी १-२ चमचे पाणी घालून घट्ट गोळा तयार करा. आता पिठाचे लांबट गोळे (Rolls) तयार करा. स्टीमर किंवा चाळणीला तेल लावून हे गोळे १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. वाफवलेले रोल पूर्णपणे थंड होऊ द्या (थंड झाल्यावरच वड्या छान कापल्या जातात). त्यानंतर त्याचे अर्धा इंच जाडीचे काप करून घ्या. वड्या कुरकुरीत होण्यासाठी दोन पर्याय आहे.  
डीप फ्राय: कडकडीत तेलात वड्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
शॅलो फ्राय: कमी तेलात तव्यावर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत करून घ्या.
मुलांना देताना या वड्यांसोबत पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचअप द्या.
ALSO READ: दुपारच्या जेवणात पोटाला थंडावा देणारा 'तडका कर्ड राईस'; ५ मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी
काही खास टिप्स-
बेसनसोबत थोडे तांदळाचे पीठ नक्की वापरा, यामुळे वडी बराच वेळ कुरकुरीत राहते.
पीठ मळताना पाणी खूप कमी वापरा. पीठ सैल झाले तर वड्या मऊ पडतात.
वडीच्या वरून भरपूर तीळ लावल्यास दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही 'नटी' फ्लेव्हर येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उन्हाळ्यात वजन कमी करायचेय? दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि पुदिना चटणीचा आरोग्यदायी पर्याय
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: घरी अचानक पाहुणे आले तर झटपट बनवा मिक्स पकोडे रेसिपी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Beetroot Cheese Tikki संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पौष्टिक पर्याय 'बीटरूट चीज टिक्की'

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

पुढील लेख
Show comments