Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rose Day निमित्त गुलाबाचा सुवास आणि स्वाद असलेल्या या ३ खास रेसिपी

Updated: गुरूवार, 5 फेब्रुवारी 2026 (20:24 IST)
 
२. इन्स्टंट रोज नारळ लाडू 
साहित्य-
१.५ कप ओले किंवा सुके खोबरे (किस)
१/२ कप कंडेन्स्ड मिल्क
२ चमचे रोज सिरप
थोडे तूप 
 
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून खोबऱ्याचा कीस २ मिनिटे परतून घ्या. त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि रोज सिरप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण कोमट असतानाच त्याचे छोटे लाडू वळा आणि सुक्या खोबऱ्यात घोळवून घ्या. वरून गुलाबाची एक पाकळी लावून सजवा. ह्या मिठाईचा गुलाबी रंग पाहता क्षणी मनाला मोहवून टाकतो.
 
३. रोज गुलकंद मूस  
साहित्य-
व्हिप्ड क्रीम  १ कप
गुलकंद २ मोठे चमचे
रोज सिरप २ मोठे चमचे
दूध २-३ चमचे
गुलाबाची फुले/पाकळ्या 
बदाम-पिस्त्याचे काप 
 
कृती-
सर्वात एका बाऊलमध्ये थंड व्हिप्ड क्रीम घ्या आणि ती घट्ट होईपर्यंत इलेक्ट्रिक बीटरने फेटून घ्या. एका छोट्या वाटीत २ चमचे गुलकंद आणि थोडे दूध एकत्र करून पेस्ट बनवून घ्या, जेणेकरून तो क्रीममध्ये नीट मिसळला जाईल. फेटलेल्या क्रीममध्ये गुलकंदाची पेस्ट आणि २ चमचे रोज सिरप घाला. चमच्याने हलक्या हाताने  मिक्स करा जेणेकरून क्रीमचा हलका गुलाबी रंग येईल.  हे तयार मिश्रण काचेच्या ग्लासात किंवा बाऊलमध्ये काढा. वरून पुन्हा थोडे रोज सिरप डिझाईनसाठी टाकू शकता.   हे मूस किमान १ ते २ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी वरून सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाकून सजवा. हे बनवायला अतिशय सोपे आहे आणि दिसायला खूपच प्रीमियम वाटते. या रेसिपींमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यास स्वाद अधिक नैसर्गिक आणि छान येतो. तसेच सजावटीसाठी तुम्ही वाळलेल्या गुलाबाच्या कळ्या देखील वापरू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Valentine's Day Special Recipe चॉकलेट स्ट्रॉबेरी केक
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Rose Day Special पार्टनरसाठी बनवा हेल्दी बीटरूट पॅनकेक

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

Hoonemoon Phase लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही 'हनीमून फेज' टिकू शकते का? न्यूरोसायन्सने दिले उत्तर!

Latte Makeup Look फाउंडेशनच्या जाड थराशिवाय मिळवा ग्लोइंग फेस !

पावसाळ्याच्या दिवसांसाठी उत्तम आणि बनवायला खूप सोपी Corn Poha Recipe

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट Korean Cream Cheese Garlic Bread

पुढील लेख
Show comments