Dharma Sangrah
✕

'Rose Day' Special बनवा शाही आणि सुगंधी रेसिपी गुलाब रसमलई

Updated: शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 (13:09 IST)

साहित्य-
१ लिटर गाईचे दूध
२ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर
१ चमचा कॉर्नफ्लोअर (ऐच्छिक)
गुलाबी फूड कलर (१ थेंब)
५०० मिली दूध (फुल क्रीम)
४-५ चमचे साखर
२ चमचे रोज सिरप 
१/२ चमचा वेलची पूड
गुलाबाच्या सुक्या पाकळ्या 
पिस्त्याचे काप
१ कप साखर
४ कप पाणी
ALSO READ: Rose Day Special पार्टनरसाठी बनवा हेल्दी बीटरूट पॅनकेक
कृती-
सर्वात आधी दूध गरम करायला ठेवा उकळी आली की गॅस बंद करा आणि त्यात थोडे थोडे लिंबू पाणी टाकून दूध फाडून घ्या. हे फाटलेले दूध एका सुती कापडावर गाळून घ्या आणि थंड पाण्याने धुवून घ्या. कापड घट्ट बांधून ३०-४० मिनिटे टांगून ठेवा, जेणेकरून पूर्ण पाणी निघून जाईल. आता हा छेना एका ताटात घेऊन हाताच्या तळव्याने ५-७ मिनिटे चांगला मळा. त्यात १ थेंब गुलाबी रंग आणि कॉर्नफ्लोअर घालून एकजीव करा. याचे लहान लहान चपटे गोळे तयार करून घ्या. आता एका मोठ्या भांड्यात १ कप साखर आणि ४ कप पाणी उकळायला ठेवा. पाण्याला चांगली उकळी आली की तयार केलेले गुलाबी गोळे त्यात सोडा. झाकण ठेवून १०-१२ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. गोळे आकाराने दुप्पट होतील. त्यानंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्या. आता दुसऱ्या एका कढईत ५०० मिली दूध आटवायला ठेवा. दूध अर्धे होईपर्यंत आटवा. त्यात साखर आणि वेलची पूड घाला. गॅस बंद केल्यावर त्यात २ चमचे रोज सिरप घाला गरम दुधात रोज सिरप घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून कोमट असताना घालावे यामुळे रसाला सुंदर गुलाबी रंग आणि गुलाबाचा स्वाद येईल. चाळणीतल गोळे हलक्या हाताने दाबून त्यातले जास्तीचे पाणी काढून टाका. हे गोळे तयार गुलाबी रबडीमध्ये सोडा.  कमीत कमी ३-४ तास फ्रिजमध्ये ठेवा जेणेकरून रसमलईचा गोडवा गोळ्यांमध्ये नीट मुरेल. आता सर्व्ह करताना वरून सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: व्हॅलेंटाईन डे विशेष रेसिपी Heart Shape Pancake
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Rose Day Recipe जोडीदाराला द्या सरप्राईज, नक्की ट्राय करा रोझ पन्ना कोट्टा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

वजन मोजण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या वजन मोजण्याची योग्य वेळ आणि महत्त्वाच्या टिप्स

B.Tech in Leather Engineering Technology मध्ये करिअरची संधी; पात्रता, शीर्ष महाविद्यालये, व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments