ganesh chaturthi
✕

लहान मुले पालक खात नसतील तर पालक-राईस बनवून करा ऑयरनची कमतरता भरुन काढा

Updated: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:24 IST)
 
हिवाळ्यात पालकाचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. विशेष बाब म्हणजे पालक सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. पालकामध्ये भरपूर पोषक आणि भरपूर अँटिऑक्सिडंट असतात.
 
पालक राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
बासमती तांदूळ 
ताजी पालक 
बारीक चिरलेला 
बटाटा 
हिरवी मिरची 
चिरलेला कांदा 
लसूण 
चवीनुसार मसाले (गरम मसाला, हळद, धने पावडर, मिरची, हिंग, तेजपत्ता, मीठ) 
 
पालक राईस बनवण्याची कृती-
पालक राईस बनवण्यासाठी, सर्वप्रथम बासमती तांदूळ शिजवा जसे आपण साधा भात तयार करतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते इलेक्ट्रिक कुकर किंवा प्रेशर कुकरमध्येही तयार करू शकता.
 
तांदूळ शिजेपर्यंत मिक्सरच्या भांड्यात आवश्यकतेनुसार पालक घ्या आणि बारीक करा, बारीक करताना थोडे मीठ घाला. बारीक झाल्यावर पालकाची पेस्ट खूप घट्ट होत असेल तर त्यात थोडे पाणी टाका, आता गॅसवर पेन ठेवून तेल गरम करा, तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला. 30 ते 40 सेकंद शिजवा. नंतर बारीक चिरलेला कांदा घाला आणि हलका सोनेरी होईपर्यंत ढवळत राहा. कांदा शिजवताना गॅस मध्यम आचेवर असावा हे लक्षात ठेवा.
 
कांद्याचा रंग बदलू लागला की त्यात बारीक चिरलेला बटाटा घाला. सर्व मसाले मिसळा आणि 30 सेकंद ढवळत राहा, सर्व भाज्या नीट मिक्स होतील. आता त्यात पालक प्युरी घाला. आता पालकाचा कच्चा वास निघेपर्यंत ढवळत रहा. तुम्हाला हवे असल्यास चवीनुसार मीठ घालू शकता.
 
आता यात भात घालून चांगल्याप्रकारे मिक्स करुन घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments