Dharma Sangrah

जागतिक महिला दिन: देशाची पहिली महिला पायलट, साडी नेसून उडवले विमान

Updated: बुधवार, 6 मार्च 2019 (18:19 IST)
 
होय सरला ठकराल यांनी वयाच्या 22 व्या वर्षी विमानाची उड्डाण भरत इतिहास रचला. वर्ष 1936 मध्ये सरला ठकराल एअरक्राफ्ट उड्डाण भरणारी पहिली महिला पायलट होती. त्यांनी चक्क साडी नेसून उड्डाण भरली.
 
सरला ठकराल यांचे जन्म 15 मार्च रोजी दिल्ली येथे झाले होते. त्यांनी 1929 साली दिल्लीत असलेल्या फ्लाइंग क्लबमध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि येथेच त्यांची भेट पीडी शर्मा यांच्याशी झाली होती. त्यांसोबत विवाह केल्यानंतर त्यांनी पत्नीला व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी प्रोत्साहित केले.
 
पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सरला ठकराल जोधपुर फ्लाइंग क्लब येथे ट्रेनिंग घेत होत्या. 1936 मध्ये लाहोर येथील विमानतळ त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होता जेव्हा 22 वर्षीय सरला ठकराल यांनी जिप्सी मॉथ नावाच्या दोन सीटर विमान उडवले.
 
परंतू 1939 त्यांच्यासाठी दुख:द राहिले. कमर्शियल पायलट लाइसेंस घेण्यासाठी कठोर मेहनत करत असताना दुसरं विश्व युद्ध सुरू झाले. फ्लाईट क्लब बंद पडलं आणि त्यांना आपली ट्रेनिंग मध्येच थांबवावी लागली. याहून दुख:द म्हणजे याच वर्षी एका विमान अपघातात त्यांच्या पतीचे निधन झाले.  
 
पतीच्या निधनानंतर त्या लाहोराहून पुन्हा भारतात आल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये भरती झाल्या. येथे त्यांनी पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि फाइन आर्टमध्ये डिप्लोमादेखील केला. भारताचे विभाजन झाल्यावर सरला आपल्या दोन्ही मुलींसोबत दिल्लीला परत आल्या आणि येथे त्यांना पीपी ठकराल भेटले. दोघांनी 1948 मध्ये विवाह केले. नंतर त्या यशस्वी आणि उद्योजक पेंटर झाल्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

भाजल्यास, कापल्यास किंवा मुरगळल्यास या ५ चुका टाळा

आरसीएफएलमध्ये १० सहायक अधिकारी पदांसाठी भरती, २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

सकाळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, दररोज रात्री हे उपाय करा

रात्रभरात तुमच्या आतड्यांमधील सर्व घाण काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर सक्रिय राहायचे असेल, तर सकाळी सूर्यनमस्कार करा, त्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments