शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : बुधवार, 6 मार्च 2019 (15:04 IST)

'स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडू देऊ नका'

महिलादिन निमित्त रुपाली भोसलेने गृहिणींना दिले आरोग्यवर्धक सल्ले
 
आज महिलांमध्ये नोकरी करणारी स्त्री आणि गृहिणी असे दोन घटक पडले आहेत. ज्यात नोकरदार स्त्रिया स्वत:च्या दिसण्याविषयी विशेष चोखंदळ असतात. पण, त्या तुलनेत गृहिणीना स्वत:च्या अस्तित्वाचा विसर पडत चाललेला पाहायला मिळतोय. ‘घरगुती’ कामांमध्ये त्या इतक्या स्वतःला वाहून घेतात की आपल्या आरोग्याकडेदेखील त्यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अश्या या सर्व महिलावर्गांना अभिनेत्री रुपाली भोसलेने स्वतःसाठी वेळ द्या असा सल्ला दिला आहे. ८ मार्च रोजी सर्वत्र साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, रुपालीने ठाण्यातील न्युट्रीमेनिया क्लब येथे गृहिणींसाठी खास चर्चासत्र भरवले होते. सोशल हुटने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात रुपालीने महिलांना काही आरोग्यवर्धक सूचनादेखील दिल्या. दैनंदिन कामाबरोबरच व्यायाम किती महत्वाचा आहे, हे पटवून देताना तिने तिथल्या महिलांना काही व्यायामदेखील शिकवले. मासिक पाळीत येणाऱ्या समस्या तसेच रजोनिवृत्तीच्या काळात घ्यावी लागणारी काळजी इ. विषयावर तिने आपले मत मांडले. 'स्वत:च्या लेखी स्वत:ची असलेली प्रतिमा हा आत्मविश्वासाशी निगडित असलेला महत्त्वाचा मुद्दा असून, तो प्रत्येक स्त्रीला समझायलाच हवा. मी छान राहते, छान दिसते, ही भावना आत्मविश्वासात भर टाकते' असे रूपालीचे मत आहे. त्यामुळे दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठी फिट आणि सुंदर रहा. असा सल्ला तिने महिलांना दिला.