Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उच्चभ्रू महिलेच्या मध्यम वर्गीय भावुक स्वभावाची सुंदर कथा

Updated: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (17:22 IST)
नवऱ्याने मला बोलायची संधी नाहीच सोडली. 
"बरं चालेल" असं म्हणून मी विषय संपवला. 
"मुलगा त्याच्या बेड room मधे अजूनही लॅपटॉप वर काम करत होता."
"Sujit,  आज ऑफिसला नाही जायचं""अगं आज गाडी गॅरेजमधे दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत बसा. "वर्क फ्रॉम होम" करतोय. बाय the  way तू आज दादरला कशासाठी जातेयस? "
आता याला का जातेय हे सांगितलं तर परत माझ्या मध्यमवर्गाचा उद्धार होईल, म्हणून मी "काम आहे "एवढं मोघम उत्तर दिलं. पूर्वीच्या आमच्या दादरच्या शेजारी, मालतीकाकू घराला हातभार लावायला, त्यांच्या भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ विकतात. दुकानातून घ्यायचं तर मी त्यांच्याकडे जाऊन आणते तेवढीच त्या भावंडाना मदत. पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं जरा कठीणच. म्हणून मी सुजितला काही बोलले नाही.. 
 
 
दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे आरामात ट्रेनने दादरला गेले. इकडं तिकड्ची विचारपूस केली, गप्पा टप्पा केल्या आणि चहा पिऊन बस स्टॉपवर आले. याच्यासाठी घे,  त्याच्यासाठी घे (टिपिकल मध्यम वर्गीय !!!) असं करताना सामान अंमळ जडच झालं. कष्ट उपसायचे असा काही हव्यास नव्हता माझा. मी टॅक्सी करायचं ठरवलं. 
नकळत स्टॉपवर उभ्या असलेल्या दोघी तिघींना विचारलं, "पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का" 
"टिपिकल मध्यमवर्गीय "हा मीच मला taunt  मारला बरं का. अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच करायचे तर एकटीसाठी कशाला.. नाही का .. माझं मलाच हसू आलं. घरी जर हे सांगितलं तर सुजितचा तर स्फोटच होईल. माझं फुटकळ समाज कार्य  कसं अंगलट येऊ शकतं याच्यावर हिरीरीने चर्चा होईल. "काळ बदललाय, पण तरीही सतत अविश्वासाचे चष्मे घालून का रे वावरता. चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला.  "हे माझं म्हणणं मोडीत काढलं जाईल किंवा मध्यमवर्गीय विचारात त्याची गणना होईल. हे मला माहित होतं. 
 
मी घरी आले तर मस्त MacD च्या पार्सल वर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या पसाऱ्याने दिली... 
सवयीनुसार take away चे कंटेनर धुऊन पुसुन कपाटात ठेवले. कामवाल्या बाईंना, मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी पडतात. "टिपिकल मध्यमवर्गीय" वागणं. !!! 
 
सोफ्यावर जराशी टेकले आणि मनात विचार आला "मध्यमवर्ग "हा  स्तर जरी पैशाची आवक" या वरून पडला असेल तरी मध्यम वर्गीयांचे विचार, वागणूक, संस्कार यात खूप श्रीमंती आहे. आज पैशाची थोडी उब मिळाली, सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत योग्य आहे? चालत जाता येण्यासारखं अंतर असेल,  किंवा बस ट्रेननी जाणं सोयीचं असेल तर परवडतंय म्हणून टॅक्सिने जाणं जर मला चैन वाटत असेल तर त्यात मध्यमवर्ग कुठे आला? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ नको ह्या संस्काराची जपणूक आहे यात. सहजपणे कोणाला मदत करणं, वस्तू जपून वापरणं, आपुलकीने कोणाशी वागणं, गरजा मर्यादित ठेवणं, उच्च राहणीमान ठेवूनही दिखाऊपणा न करणं या वागण्याचा संबंध आजची पिढी पैशाशी का जोडू पहाते. हे वागणं  टिपिकल मध्यमवर्गीय म्हणून त्याची खिल्ली का उडवते. हे आकलनाच्या पलीकडे आहे आणि न पटणारे आहे. 
 
आजकालच्या आत्मकेंद्रित पिढीला या कशातही रस वाटत नाही. एकमेकांच्या संपर्कात राहणं, जुडलेलं राहणं, थेट भेटणं, हे मध्यमवर्गीय का वाटावं या पिढीला? "आई, आजकाल असं नाही आवडत लोकांना.. त्यांना त्यांची अशी space  हवी असते "असं म्हणत आपसातल अंतर वाढवणं हे उच्चभ्रू ?? माझ्या मध्यम वर्गीय विचारात न बसणारं आहे हे !!!  आपल्याला हवं तसं वागायची मोकळीक आहे ना आपल्याला. मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची.. 
 
मी मध्यमवर्गीय आहे याचा मला अभिमान आहे ना.. मग झालं की. !! असं म्हणून सगळ्यांसाठी फक्कड चहा करायला स्वयंपाक घरात घुसले. 
 
-नीलिमा जोशी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पाहुण्यांना जेवतांना साईड डिश म्हणून सर्व्ह करा स्वादिष्ट ''पनीर पेपर फ्राय''

मुलांच्या टिफिनमध्ये रोज पोळी-भाजी नको! हे १५ भन्नाट पर्याय एकदा करून पाहा

तुम्हाला माहित आहे का? ढगफुटी पर्वतीय प्रदेशातच का होते! यामागे काय कारण आहे चला तर जाणून घ्या....

श्रावणात जन्मलेल्या बाळासाठी नाव शोधताय? मुलगा-मुलगी दोघांसाठी ‘ही’ नावे पाहाच

आज नागपंचमी; नैवेद्यासाठी बनवा 'ही' पारंपरिक गोड रेसिपी

पुढील लेख
Show comments