Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'स्त्री' म्हणजे फेअर सेक्स!

Updated: मंगळवार, 5 मार्च 2019 (09:51 IST)
निसर्गानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. परंतु हे जे घडते, याबरोबरच अन्य काही आपण घडवावे असेही प्रत्येक मुलीस वाटते. मुलींना काय व्हावेसे वाटते. याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आमच्या शिक्षकांच्या उत्तरा‍त प्रतिबिंबित झाला आहे.

चाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणार्‍या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, नव्हे ती असलीच पाहिजे याची जाणीव नसेल तर, आजच्या माध्यमिक शाळेत शिकणार्‍या बहुसंख्य मुली आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहत बसतील. जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणे, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणे जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देणे हे शिक्षकाचे काम आहे. आजच्या माध्यमिक शाळांतील अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावे याबद्दलचे एक स्वप्न सुप्तावस्थेत आहे. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकात नसेल तर आमच्या अनेक मुलींची 'कोणीतरी' होण्याची स्वप्ने अंकुरित होणे कठीण होईल. इंदिरा संतांनी आपल्या 'झोका' या कवितेत म्हटले आहे -
झोका चढतो उंच उंच
मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर
त्याची ओळख पटेना!
विकसनाच्या खूप उंच झोक्यावर चढून खुली हवा चाखलेल्या स्त्रीला गुंजेएवढ्या घरात स्वत:ला दडपून राहणे कसे आवडेल? आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढे घर थोडे उलटेपालटे होणारच ना? असे होईल या भयाने स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न फार काळ यशस्वी होणार नाही. स्त्रीची जागृत अस्मिता तिच्या इच्छा आकांक्षाची उभारी, तिच्या व्यथांचे विस्फोट यांच्यापुढे आजची स्त्री गडकर्‍यांनी सिंधू होऊ शकणार नाही, हे ओळखून उद्याच्या स्त्रियांच्या आजच्या शिक्षकांनी आपले चष्मे पुसून साफ करायला नकोत काय?
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख