शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (10:34 IST)

स्त्री समाधानी असते तेव्हा...

स्त्रियांना नेहमी ऐकवलं जात कितीही करा तुझं मन काही भरत नाही.
तुझं आपलं नेहमी चालूच असतं, माझ्यासाठी कधी हे केलं का?
ते केलं का?
तू कधीच समाधानीच नसते.
 
पण,
अस नाही होे....
स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो....
 
स्त्री समाधानी असते,
जेव्हा रात्री बाळ जागे होते, रडू लागते आणि तेवढ्यात नवरा म्हणतो दे मी घेतो त्याला तू झोप....
 
स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहताना 
my best friends my mom and dad असे लिहतात.
 
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा चार लोकांसमोर तीच कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो....
 
स्त्री समाधानी असते तेव्हा , जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो...
 
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा तिचा नवरा म्हणतो, व्वा !
काय चव आहे तुझ्या हाताला.....
मुलं जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्या सारख जेवण कुणीच बनवत नाही ग.....
 
स्त्री समाधानी असते तेव्हा,
 जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो.
आणि तिच्या केसात माळतो...
 
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा संसारच्या या घाईगडबडीत
सुद्धा नवरा तिला एक गुलाब देऊन हळूच कानात येऊन म्हणतो
Happy valentine  day 
 
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा
सासुसासरे अभिमानाने सांगतात हया आमच्या सुनबाई आहेत..
छे! सुनबाई नाहीच हो,
ही तर आमची लेक हो!!!
 
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा सून म्हणते आई छान दिसतेय हं ही साडी तुम्हाला....
 
स्त्री समाधानी असते,
तेव्हा, 
जेव्हा नातवंड आजी आजोबांनाही आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा आईबाबांकडे लाडिक हट्ट करतात.
 
स्त्री समाधानी असते तेव्हा ,
जेव्हा मुलगा जाता-येता आई जेवलीस का?
बाबा कुठे आहेत ग,
जेवले का ? असे विचारतो.
 
स्त्री समाधानी असते तेव्हा
जेव्हा चौकोनी कुटूंबात आई बाबांना महत्वाचं स्थान  असतं....
 
स्त्री समाधानी असते तेव्हा,
जेव्हा तिला घरातील प्रत्येक गोष्टीत सहभागी केलं जातं....
 
स्त्री मग ती कोणत्याही वयाची असू दे तिच्यात प्रेम,माया,क्षमा सगळं असतं तिला दुर्लक्षित करू नका....
ती तुमच्या घरची लक्ष्मीच आहे,
तिला तीच स्थान द्या...
तिला दुर्लक्षित केले की ,ती भांडायला उठते म्हनून ती कजाग, उद्धट होते पण,
जेव्हा जेव्हा तिच्या मनाविरुद्ध आणि चुकीचे घडत आहे  त्या- त्या वेळी शक्तीने जन्म घेतला आहे....
म्हणून स्त्री लक्ष्मी आहे तिला तिचं स्थान द्या.....
छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ही एक निसर्गाची सुदंर कलाकृती आहे....
 
ती तुमच्या रथाच एक चाक आहे