Marathi Biodata Maker
✕

Gift For Mom साडी म्हणजे मायेची ऊब; मदर्स डे निमित्त आईला एखादी सुंदर साडी भेट देणे हा सर्वात उत्तम पर्याय

Updated: शनिवार, 9 मे 2026 (21:38 IST)
 
१. पैठणी साडी  
महाराष्ट्रीयन आईसाठी 'पैठणी' म्हणजे केवळ साडी नाही, तर एक दागिना आहे. जर तुम्हाला आईला काहीतरी शाही गिफ्ट द्यायचे असेल, तर अस्सल हाताने विणलेली पैठणी निवडा. तिचे मोर, पोपट आणि कमळाचे नक्षीकाम आईला नक्कीच आवडेल.
 
२. कांजीवरम किंवा सिल्क साडी 
जर तुमच्या आईला सण-समारंभात मिरवायला आवडत असेल, तर कांजीवरम हा सर्वोत्तम पर्याय आहे. या साड्यांचा लूक अतिशय श्रीमंत असतो. लाल, गडद हिरवा किंवा जांभळ्या रंगातील सिल्क साडी आईच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठावदार बनवेल.
 
३. चंदेरी किंवा महेश्वरी साडी 
ज्या आयांना वजनाला हलकी आणि सोबर साडी नेसायला आवडते, त्यांच्यासाठी चंदेरी किंवा महेश्वरी साड्या उत्तम आहेत. या साड्या दिसायला अत्यंत क्लासिक असतात आणि ऑफिस किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी सुटसुटीत असतात.
 
४. लिनन साडी  
आजकाल लिनन साड्यांची खूप फॅशन आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मदर्स डे येतो, त्यामुळे आईला आरामदायी वाटेल अशी साडी द्यायची असेल, तर लिननचा विचार करा. या साड्या वजनाला हलक्या आणि त्वचेला सुखावह असतात.
 
५. बांधणी किंवा लहरिया 
रंगबेरंगी गोष्टींची आवड असलेल्या आईसाठी बांधणी साडी एक फ्रेश पर्याय आहे. आईच्या आवडत्या रंगातली एखादी सुंदर बांधणी साडी तिला नक्कीच आनंदी करेल.
 
साडीसोबतच एक छानसे हाताने लिहिलेले पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरू नका. तुमच्या प्रेमाच्या दोन शब्दांमुळे त्या साडीची किंमत आईच्या नजरेत कैक पटीने वाढेल!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mother's Day Special आईसाठी स्पेशल मेन्यू
Edited by-Dhanashri Naik
ALSO READ: Mother's Day 2026 wishes in Marathi मदर्स डे शुभेच्छा
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस लांब, दाट व चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments