शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (16:39 IST)

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

ठाण्याच्या एका व्यवसायीक कंपनीच्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावर रात्री भीषण आग लागली या ठिकाणी उपस्थित असलेल्या 10 जणांना वाचविण्यात यश आले आहे. ही माहिती ठाणे महापालिकेने दिली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. 

माहितीनुसार, ठाणे शहरातील खोपट भागात कॅडबरी जंक्शन येथे असलेल्या 16 मजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावर असलेल्या ट्रस्ट कार्यालयात भीषण आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. इमारतीच्या सातव्या मजल्यावरील नेत्र चिकित्सालय मध्ये उपचार घेत असणाऱ्या 9 जणांची  आणि रुग्णालयातील आणखी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. 
आग लागण्याची माहिती मिळाल्यावर आरडीएमसी, अग्निशमन दल आणि ठाणे जिल्हा बचाव दल चे जवान उपस्थित होते. 

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास लागली कार्यालय बंद असल्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवायला अडचण आली. कार्यालयाचे दार उघडण्यासाठी दरवाजा तोडावा लागला आज पहाटे 4 वाजे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु होते. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कार्यालय जाळून खाक झाले आहे. 
Edited by - Priya Dixit