Daily Horoscope
✕

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा', मुंबई विमानतळ आणि महालक्ष्मी रेसकोर्सला बॉम्बच्या धमक्या

Updated: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2026 (17:54 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील 'जलसा' बंगल्याला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबई प्रशासनाला मिळालेल्या एका नव्या धमकीच्या ईमेलमध्ये 'जलसा' तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा उल्लेख आहे. हा धमकीचा ईमेल समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, ईमेलमध्ये उल्लेख असलेल्या सर्व ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. तसेच महापौर कार्यालय आणि विमानतळासह अनेक प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.
ALSO READ: सुनेत्रा पवार गटातील २२ आमदार पक्ष सोडणार, संजय राऊत यांचा दावा
वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना मिळालेल्या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबई महापौरांचे कार्यालय, महानगरपालिका, एक बँक, एक न्यायालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा उल्लेख आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, बॉम्ब शोधक पथके आणि सुरक्षा कर्मचारी या सर्व ठिकाणांची कसून तपासणी करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शोधादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसारखे साहित्य सापडले नाही. सध्या, पोलीस सायबर टीमच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे आणि धमकीच्या सत्यतेची चौकशी करण्याचे काम करत आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Cricket matches १३ नोव्हेंबर या एकाच दिवशी चार मोठे सामने खेळले जातील, वेळापत्रक पहा

भारताने १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला

मुंबई लोकलमध्ये २० वर्षीय तरुणीची छेडछाड; धावत्या ट्रेनमधून रुळावर ढकलल्याने गमवावा लागला डावा हात

LIVE: सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले; उड्डाणादरम्यान घडली दुर्घटना

पुण्याचे नाव बदलून 'फुलेनगर' करण्याची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर

पुढील लेख
Show comments