Daily Horoscope
✕

जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टरने मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली

Updated: बुधवार, 9 जुलै 2025 (18:39 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी बांधण्यात आलेले अटल सेतू पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या अटल सेतूवर आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अटल सेतू आत्महत्येचा बिंदू बनला आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांत अटल सेतूवर सतत आत्महत्येच्या घटना घडत आहे. अशा परिस्थितीत आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे.
ALSO READ: भारतीय वायुसेनेतील फायटर विमान क्रॅश
जेजे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावरील अटल सेतूवरून उडी मारली. ही घटना सोमवारी रात्री घडली आणि डॉक्टरचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे कळले आहे. दरम्यान, ही घटना एका व्यक्तीने पाहिली आणि डॉक्टरला पुलावरून खाडीत उडी मारताना पाहिले. त्यानंतर त्या व्यक्तीने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपासात पुलावर एक चारचाकी गाडी आणि एक मोबाईल फोन आढळून आला. अटल सेतूवरून खाडीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव डॉ. ओंकार भागवत कविटके (वय ३२) असे समोर आले आहे. ओंकार कविटके हे जेजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात. ते कळंबोली येथील रहिवासी आहे आणि सोमवारी रात्री अटल सेतू येथे आले आणि त्यांनी त्यांची कार थांबवली आणि क्षणार्धात खाडीत उडी मारली. माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला आणि पुलावर एक होंडा अमेझ आणि एक आयफोन आढळला.
ALSO READ: आमदार वसतिगृहात झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- सत्तेचा गैरवापर करणे चुकीचे आहे
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र वेतन नियम २०२६" लागू केले; आता ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

UPI services closed देशात उद्या बंद राहणार यूपीआय सेवा

ऍपलच्या अनेक सेवा का बंद पडल्या? या तांत्रिक बिघाडांमागे सायबर हल्ला हे कारण आहे का? कंपनीने काय सांगितले?

पुढील लेख
Show comments