Dharma Sangrah
✕

बातमी उपयोगाची, मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Updated: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:47 IST)
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० वाजता ते दुपारी ३ वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व डाउन विशेष उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर धिम्या मार्गावरील सर्व अप उपनगरी विशेष सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
 
तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी १० वाजून ४० ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर अप हार्बर मार्गावर सकाळी १० वाजतापासून ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत बंद राहील. तर पनवेल/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ९.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिव्यांगांच्या कल्याणासाठी मोठा निर्णय! बजाज ऑटोला ६६.८२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

LIVE: विदर्भात, नागपूरसह चक्रीवादळाचा इशारा! दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

अरविंद सावंतांचा निवडणूक आयोगावर घणाघात! मुख्य निवडणूक आयुक्तांना 'खोटारड्यांचा प्रमुख' म्हणत साधला निशाणा

CNG Cars Under 5 Lakhs ५ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम CNG कार; पाहा फीचर्स

पुढील लेख
Show comments