suvichar

मुंबईच्या ‘बेस्ट बस' ने घेतले 'हे' दोन महत्वाचे निर्णय

Updated: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:20 IST)
 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेस्टने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यातील एक म्हणजे बेस्टने फक्त एका रुपयात बेस्ट आझादी योजनेची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत चालो ऍपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा म्हणजेच एका आठवड्याचा बस पास हा केवळ एका रुपयात डाऊनलोड करता येणार आहे. यामध्ये प्रवाशांना वातानुकुलीत किंवा विना वातानुकूलित बस मध्ये सात दिवसांमध्ये कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येणार आहे.
 
१५ ऑगस्ट २०२२ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. सद्य स्थितीत ३३ लाख प्रवाशी रोज बेस्टने प्रवास करतात त्यापैकी २२ लाख प्रवासी चालो ऍपचा वापर करतात, तर ३. ५ लाख प्रवासी डिजटल तिकीट प्रणालीचा वापर करतात.
 
मुंबईकरांना प्रवासाचा सुखद अनुभव देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबल डेकर बस घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने काही दिवसांपूर्वीच घेतला. बेस्टच्या डबल डेकर बस या जास्त प्रवासी वाहतुक क्षमतेच्या आहेत. आता इलेकट्रीक बसच्या पर्यायामुळे इंधनाची सुद्धा बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दृष्टीने अधिक प्रवासी क्षमतावाढ सुद्धा शक्य होणार आहे. वर्षा अखेर पर्यंत या डबल डेकर ई – बस मुंबईच्या रस्त्यांवर धावणे अपेक्षित आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आता टीटीईसोबत वाद घालणे महागात पडेल! ट्रेनची तिकिटे कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली तपासली जातील

"मोदीजींना समजावा ना प्लिज!" भारतीय Gen-Z ची इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याकडे अनोखी मागणी

Groundnut cultivation भुईमुगाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीची संपूर्ण माहिती

टाटा सुमो कारवर मोठा दगड पडल्याने १३ जणांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

विमानाच्या शौचालयात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले, मुंबई विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह ५ जणांना अटक

पुढील लेख
Show comments