सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (16:12 IST)

दादर: बेस्ट बसची डंपरला धडक

मुंबई - सायन रुग्णालयाने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलेल्या माहितीनुसार दादर टीटी येथे आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास बेस्ट बसने डंपरला धडक दिली. या धडकेत बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर, प्रवासी असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी असल्याची 
माहिती मिळाली आहे. 
 
बेस्ट उपक्रमाची बस मार्ग क्रमांक २२ ही मरोळ मोरोशी ते पायधुनी या मार्गावर चालते. आज या मार्गावरील बस पहाटे सव्वा सातच्या सुमारास दादर टीटी येथे आली असता बेस्ट बस चालकाने डम्परला मागून येऊन धडक दिली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या धडकेमुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.