रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (10:23 IST)

आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी विशेष टीम करणार चौकशी

aditya thackeray
मुंबई : दिशा सालियन प्रकरणी शिंदे सरकार एसआयटी तपास करणार आहे. आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक हे काम करणार आहे. दिशा सालियन प्रकरणी काही आमदार ठाकरेंकडे चौकशीची मागणी करत होते.
 
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 
 
त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या या तपासात अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाबाबत घोषणा केली जाऊ शकते.