suvichar
✕

आजपासून मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो धावणार, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Updated: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (10:38 IST)
 
10 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर मुंबईत भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. आरे JVLR आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यानची मुंबई मेट्रो लाईन-3 चा 12.69 किमी लांबीचा भाग शनिवारी उघडला जाईल.
 
मेट्रोच्या उद्घाटनच्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी होणार आहे.
 
तसेच मुंबई मेट्रो लाईन-3 ला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी बीकेसी मेट्रो स्टेशनवर पोहोचतील. या प्रवासादरम्यान ते लाडली बहीण लाभार्थी, विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी ट्रेनमध्ये संवाद साधतील. PM मोदी मेट्रो कनेक्ट-3, आधुनिक वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केलेले मोबाइल ॲप देखील लॉन्च करतील. तसेच मुंबईच्या भूमिगत मेट्रोचा प्रवास दाखवणाऱ्या कॉफी टेबल बुकचेही अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments