मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (08:42 IST)

PM Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार

Narendra Modi
पीएम नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. ते वाशिम येथे जाऊन पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिराचे दर्शन घेणार आहे. तसेच वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील.    
 
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान ठाण्यातील 32800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे.  
 
तसेच ते कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाइन 3 या शहरातील पहिल्या पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मुंबईतील इतर विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करतील.  
 
मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन व  मंत्री मनोहर लाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे
 
आधुनिक वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी डिझाइन केलेले MetroConnect3 हे मोबाईल ॲप देखील पंतप्रधान लॉन्च करतील. तसेच मुंबईच्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासाचे वर्णन करणाऱ्या कॉफी टेबल बुकचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या पुस्तकात मेट्रोच्या उत्क्रांतीबद्दल तपशीलवार विस्मयकारक दृश्यांचा संग्रह आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहे.