Festival Posters
✕

ठाण्यात पाणी घ्यायला जात असलेल्या तरुणीचा विनयभंग, भावाने विरोध केल्यावर मारहाण

Updated: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (13:20 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या सुंदरनगर परिसरात एका झोपडपट्टीत राहणारी 19 वर्षीय तरुणी सोमवारी संध्याकाळी सार्वजनिक नळातून पाणी आणायला जात असताना तरुणाने तिला एकटी जाताना पाहून तिला झुडपात नेऊन तिचा विनयभंग केला.पीडित तरुणीने आरोपीला धक्कादेत तिथून पळून घर गाठले आणि घडलेले भावाला सांगितले.  
 
भावाने तरुणाच्या घरी जाऊन जाब विचारल्यावर तरुणाने आणि त्याच्या कुटूंबियांनी पीडित तरुणीच्या भावाला मारहाण केली आणि लोखंडी रॉड  डोक्यात घातला त्यात तो गंभीर जखमी झाला. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच तरुणीच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुण, त्याचे वडील आणि दोन भावांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit   

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

ईव्ही प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Riverची नवी इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंगसाठी रस्त्यावर; डिझाइनने वेधले लक्ष

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; ऐनवेळी रस्तेमार्गे करावा लागला प्रवास!

मुदतबाह्य दूध-पनीर आणि स्वयंपाकघरात झुरळे; अस्वच्छतेमुळे लोणावळ्यातील चार मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित

महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार

पुढील लेख
Show comments