Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरएसएसच्या कार्यक्रमावर चाकू आणि काठ्यांनी हल्ला, 7-8 जण जखमी

Updated: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (12:41 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार भजन-कीर्तन झाल्यानंतर खीर वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना 20-25 जण तेथे आले आणि त्यांनी आधी खीरच्या भांड्याला लाथ मारली आणि नंतर शिवीगाळ सुरू केली. उपस्थित लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 7-8 जणांवर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांना घटनास्थळीच पकडण्यात आले असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. व परिस्थिती नियंत्रणात आहे.
 
भाजपचे माजी अध्यक्ष अरुण चतुर्वेदी म्हणाले की, करणी विहार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रजनी विहारमध्ये संघाच्या कार्यक्रमादरम्यान काही समाजकंटकांनी संघ कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच करणी विहार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या हल्ल्यामागील कारणाचा शोध घेत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments