1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (15:56 IST)

राजस्थानमध्ये स्कूल बस उलटली, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 9 जखमी

Rajasthan News
राजस्थानमधील फलोदी येथे भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलांनी भरलेली स्कूल बस पलटी झाली असून, यात दोन मुलांचा मृत्यू झाला असून 9 मुले गंभीर जखमी झाली आहेत. फलोदी जिल्ह्यातील रानीसर गावात मोरिया पडियाल रोडवर सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. जखमी मुलांना फलोदी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
 
अपघात होताच ग्रामस्थांनी जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. मुले रुग्णालयात पोहोचताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पीएमओ, सीएमएचओ आणि रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी मुलांवर उपचार करित आहे. राणीसर गावचे सरपंच चंद्रवीर सिंह राठोड हेही रुग्णालयात पोहोचले व परिस्थितीचा आढावा घेतला.