गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (18:58 IST)

उदयपूरमध्ये विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केल्यानंतर हिंसाचार उसळला,कलम 144 लागू

उदयपूर जिल्ह्यातील सूरजपोल परिसरात शुक्रवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. या विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच संतप्त हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. या काळात अनेक वाहनांची जाळपोळ करण्याच्या घटनाही घडल्या. 
 
शुक्रवारी उदयपूरच्या सूरजपोल पोलीस स्टेशन परिसरात दोन शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, चाकू हल्ला झाल्याची घटनाही समोर आली आहे. या चाकूच्या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सूरजपोल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. 

विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही वेळातच हिंदू संघटनांशी संबंधित हजारो कार्यकर्ते रुग्णालयाच्या इमर्जन्सी गेटवर पोहोचले आणि जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा मोठा ताफा रुग्णालयात पोहोचला. 
या घटनेनन्तर काही लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. अग्निशमनच्या दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे. 
Edited by - Priya Dixit