शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2024 (11:29 IST)

शाळेमध्ये 10वी क्लासच्या विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू

heart attack vs cardiac arrest
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये एक घटना घडली आहे. इथे10वी च्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी चालत असतांना अचानक कोसळला व बेशुद्ध झाला. त्यानंतर शाळेच्या स्टाफ ने त्याला लागलीच रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झालेला होता. त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्यादिवशीच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  
 
बांदीकुई पोलीस अधिकारींनी सांगितले की, चिकिस्तकांचे म्हणणे आहे की त्याला हार्ट अटॅक आला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, पण ठोस कारण पोस्टमोर्टमनंतरच समजेल असेल पोलिसांनी सांगितले आहे.  पण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी परवानगी दिली नाही. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याला हृदयाचा आजार होता व त्यावर उपचार सुरु होते. तसेच पोलिसांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे कुटुंब त्याच्यावर अंतिम संस्कार अलवर मध्ये आपल्या पैतृक गावी करणार आहे.