शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 8 जुलै 2024 (11:10 IST)

मुंबई हिट अँड रन केस वर्ली प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

Mumbai BMW Car Accident
मुंबई मधील वर्ली पोलिसांनी हिट अँड रन केस प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. वर्ली पोलिसांनी रविवारी मोठ्या कारवाई नंतर दोन जणांना अटक केली आहे. वर्ली पोलिसांनी मोठ्या चौकशीनंतर राजेश शाह आणि अपघाताचा वेळी कार मध्ये असणार्या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच घटनेनंतर आरोपी मिहीर शाह फरार आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एकूण सहा टीम बनवली आहे. 
 
मुंबई वर्ली परिसरात हिट अँड रन केस मुख्य आरोपी मिहीर शाह चे वडील आणि ड्राइव्हर राजर्षी बीदावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या केस मध्ये मिहीर मुख्य आरोपी आहे असे सांगण्यात आले आहे. पोलीस चौकशींमध्ये समोर आले की कारचा कोणताही विमा नव्हता. विमाची वेळ संपली होती. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मिहीर गाडी चालवत होता. या अपघातानंतर आरोपी फरार आहे. तर आरोपी मिहीरचे वडील राजेश शाह पालघर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे नेतृत्ववाली शिवसेना चे पदाधिकारी आहे.