1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2024 (09:50 IST)

मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळा -कॉलेजांना सुट्टी जाहीर

heavy rains in Mumbai
मुंबईत काल पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विविध ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून काही भागांमध्ये पाणी साचले आहे. पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुळसळधार पावसामुळे शाळा आणि कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. 

मुंबईत आज जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई महानगर महापालिकाने शासकीय आणि खासगी माध्यमाच्या  शाळा आणि कॉलेजांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसामुळे रस्ते, नाले गटार वाहू लागले आहे. गटाराच पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

रेल्वेचे रूळ देखील पाण्याखाली गेले आहे. रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची गर्दी आहे. 
अंधेरीत तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. अंधेरी परिसरात वाहन चालकांसाठी बंद करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी बेरिकेट्स लावले आहे. पाणी उपसण्याचे काम महापालिका आपत्ती नियंत्रण विभाग करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit