Biodata Maker marathi
✕

प्रसिद्ध साबरमती नदीत कोरोना विषाणू आढळून आला

Updated: शुक्रवार, 18 जून 2021 (17:15 IST)
 
असे सांगितले जात आहे की साबरमतीशिवाय, अहमदाबादच्या इतर जल स्त्रोत कांकरिया, चंदोला तलावातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्येही कोरोना संसर्ग आढळून आला आहे. असंही म्हटलं जात आहे की आसामच्या गुवाहाटीमध्ये वाहणार्‍या भारू नदीतून संसर्ग झालेल्या सुद्धा संशोधकांना सापडला आहे.
 
साबरमती नदीच्या सर्व नमुन्यांमध्ये कोरोनाची पुष्टी झाल्याने वैज्ञानिकही आश्चर्यचकित आहेत. वास्तविक पाहता आयआयटी गांधीनगरसह देशातील आठ संस्थांनी नद्यांच्या पाण्यातील कोरोना संक्रमणासंदर्भात संशोधन केले आहे. राजधानी गांधीनगरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अर्थ विज्ञान विभागाचे मनीष कुमार यांनी माहिती दिली आहे की आतापर्यंत केवळ कोरोनाचे सांडपाणी रेषेत अस्तित्त्वात असल्याची पुष्टी केली गेली होती, परंतु आता हा विषाणू नदीतही सापडला आहे.
 
मनीष कुमार यांनी सांगितले की साबरमती नदीतून 694 नमुने, कांकरिया तलावातील 549 आणि चांदोला तलावातील 402 नमुने घेण्यात आले आहेत. विषाणूची लागण झाल्यानंतर, संशोधकांचा असा विश्वास आहे की देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांची चौकशी केली पाहिजे, कारण विषाणूचे बरेच गंभीर म्यूटेशन दुसर्‍या लाटेत दिसून आले आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख