शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 जून 2021 (15:10 IST)

दिल्ली: 'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसादने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयात दाखल

कोरोना काळात चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील मालवीय नगर भागातील रहिवासी कांता प्रसादने दारू पिऊन झोपेची गोळी घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही बाब गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आहे. जेव्हा कांता प्रसाद नशा करताना झोपेच्या गोळ्या खाल्ले.
 
रात्री उशिरा कांता प्रसाद यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता बाबा कांता प्रसाद धोक्याच्या बाहेर आहे. पोलिसांना याची माहिती रुग्णालयातूनच मिळाली.
 
दिल्ली पोलिसांचे डीसीपी दक्षिण अतुल ठाकुर यांनी निवेदनात म्हटले आहे की रात्री उशिरा 80  वर्षीय कांता प्रसाद यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांता प्रसाद यांनी मद्यपान केले होते आणि झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. कांता प्रसाद यांच्या मुलाचे निवेदन घेण्यात आले आहे, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.