सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:44 IST)

दुर्दैवी ! महिलेचा 2 चिमुकल्यासह आत्महत्येचा प्रयत्न; दोन्ही बालकांचा मृत्यू

जत : महिलेने रागाच्या भरात दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. यात दोन्ही बालकाचा दुर्देवी अंत झाला असून महिला मात्र बचावली आहे. खैराव ( ता. जत ) येथे बुधवारी (दि. 26) सकाळी 10 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रागाच्या भरात निष्पाप बालकांचा अंत झाल्याने लोणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचा प्रयत्नाचे कारण नेमके समजू शकले नाही.
 
सुप्रिया शंकर बुरुंगले (वय. 2 वर्षे) समर्थ शंकर बुरुंगले (वय 9 महिने ) असे मृत बालकांची नावे आहेत. रूपाली शंकर बुरुंगले ( वय 40 रा. मूळगाव लोणार (ता. मंगळवेढा) असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे.
 
प्राप्त माहितीनुसार, रूपालीचे लोणार येथील शंकर बुरुंगले यांच्याशी 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन मुले होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रूपालीने खैराव हद्दीतील स्वतःच्या विहिरीत दोन्ही मुलाना टाकले. त्यानंतर स्वतः उडी घेतली.यात दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रूपालीने मोटर सोबत असलेल्या रस्सीला पकडल्याने ती बचावली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.