शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (16:11 IST)

शरद पवार यांच्या बारामतीतील निवास्थानी सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निवासस्थानाच्या चहुबाजूंनी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उजनी पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलन करणार आहेत. बारामतीमध्ये २ शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापुरमधील शेतकरी आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर होणार आहे. पोलीस सतर्क असून शेतकऱ्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुर आणि इंदापुरच्या शेतकऱ्यांनी उजनी पाणी प्रश्नी आंदोलन सुरु केल आहे. बारामतीत शेतकरी शरद पवारांच्या निवास्थानी आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
उजनीचे पाणीप्रश्न  इंदापुर आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांनी गेल्या काहिदिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. यापुर्वी इंदापुरमध्ये या शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. सोलापुरचे शेतकरी बारामतीतील शरद पवारांचे निवासस्थान गोविंद बाग येथे आंदोलन करणार आहेत अशी माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे.