शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (12:52 IST)

राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन झाले. मलिक यांचे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हाजी गफ्फार मलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातील संयत नेतृत्व हरपले, अशी भावना व्यक्त केली.
 
जळगाव जिल्हा आणि राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हाजी मलिक यांचे चांगलेच वर्चस्व होते. आपल्या भाषणात विविध उदाहरणे आणि शेरोशायरीने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला आहे.
 
अंत्यसंस्कार उद्या मंगळवारी दिनांक २५ मे रोजी दुपारी २ वाजता मुस्लिम कब्रस्थान येथे होणार आहे.
 
शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्य प्रमुख डॉ. हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन आणि इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्च शिक्षणासाठी आणि औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयत तरीही आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.