शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (15:58 IST)

कंपनीच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातल्या भोसरी एमआयडीसी मधील प्रायमा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज या कंपनीच्या पाठीमागील बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
जुगार चालक रेहमान इस्माईल शेख (वय 34), गणेश विष्णु मातंग (वय 35, दोघे रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी), जुगार खेळी ईलियास मुसा पठाण (वय 31 रा. लींकरोड, चिंचवड), प्रकाश बसवराज जमादार (वय 23), बाबासाहेब बाळू भोसले (वय 24), फिरोज फरदुल्ला शेख (वय 34, तिघे रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी), निखिल अनिल पवार (वय 29, रा. अजमेरा पिंपरी), सुनील मारुती दळवी (रा. शिरगाव, ता. मावळ), निलेश जनार्धन कटके (वय 43, रा. मोहननगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसरी एमआयडीसी मधील प्रायमा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज या कंपनीच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते. याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने  जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 47 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.