सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (16:03 IST)

पुण्याचे बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचे धाड

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसंच हॉटेल व्यवसायिक आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कार्यालयात पोहोचले. ईडीकडून अविनाश भोसले यांची चौकशी सुरु आहे. अविनाश भोसले यांची याआधी नोव्हेंबर महिन्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसंच आयकर विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती.