1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (13:30 IST)

वसंत पंचमी 2021 : विद्यार्थ्यांनी ही कामे नक्की करावी

Vasant Panchami 2021
वर्ष 2021 साली वसंत पंचमी 16 फेब्रुवारी आहे-
 
सरस्वती वसंत पंचमी शुभ मुहूर्त
प्रात: 6.59 ते 12.35 पर्यंत
 
वसंत पंचमी सर्वांसाठी महत्त्वाची तिथी आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची आराधना करावी. जे सरस्वतीच्या अवघह मंत्राचा जप करु शकत नाही त्यांच्यासाठी प्रस्तुत आहे सरस्वती देवीचे सोपे मंत्र. वसंत पंचमीला या मंत्राचे जप करुन विद्या आणि बुद्धी यात वृद्धी होते.
 
* 'ॐ शारदा माता ईश्वरी मैं नित सुमरि तोय हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय।'
 
- सरस्वती देवीचं सुप्रसिद्ध मंदिर मैहर येथे स्थित आहे. मैहर येथील शारदा मातेला प्रसन्न करण्यासाठी मंत्र या प्रकारे आहे.
 
* 'शारदा शारदांभौजवदना, वदनाम्बुजे।
सर्वदा सर्वदास्माकमं सन्निधिमं सन्निधिमं क्रियात्।'
 
- शरद काळात उत्पन्न कमळासमान मुख असणारी आणि सर्व मनोरथ पूर्ण करणारी शारदा देवी सर्व समृद्धीसह माझ्या मुखात सदैव निवास करावी.
 
* सरस्वती बीज मंत्र 'क्लीं' आहे. शास्त्रांमध्ये क्लींकारी कामरूपिण्यै यानी 'क्लीं' काम रूपात पूजनीय आहे.
 
खालील मंत्राने मनुष्याची वाणी सिद्ध होते. सर्व कामना पूर्ण करणारा हा मंत्र सरस्वतीचा सर्वात दिव्य मं‍त्र आहे.
 
* सरस्वती गायत्री मंत्र : 'ॐ वागदैव्यै च विद्महे कामराजाय धीमहि। तन्नो देवी प्रचोदयात्‌।'
 
या मंत्राने 5 माळी जपल्याने देवी प्रसन्न होते आणि साधकाला ज्ञान-विद्या लाभ प्राप्ती सुरु होते. विद्यार्थ्यांनी ध्यानासाठी त्राटक अवश्य करावे. दररोज 10 मिनट त्राटक केल्याने स्मरण शक्ती वाढते. एकदा अध्ययन केल्याने सर्व कंठस्थ होतं.