मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (11:55 IST)

वसंत पंचमी : सरस्वती देवी पूजा विधी

वसंत (बसंत) पंचमी सण माघ शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याचे विधान आहे. 
 
वाणी, लेखणी, प्रेम, सौभाग्य, विद्या, कला, सृजन, संगीत आणि समस्त ऐश्वर्य प्रदान करणारी देवी सरस्वती कडून शुभ आशीष प्राप्त करण्याचा दिवस आहे वसंत पंचमी. विवाहसाठी देखील हा मुर्हूत श्रेष्ठ मानला गेला आहे.
 
वसतं पंचमी पूजा विधी
 
सकाळी सर्व नित्य कार्य आटपून सरस्वती देवीच्या आराधनाचा संकल्प घ्यावा.
 
अंघोळ केल्यावर गणपतीची पूजा करावी.
 
स्कंद पुराणानुसार पांढरे फुलं, चंदन, श्वेत वस्त्र याने देवी सरस्वतीची पूजा करावी.
 
सरस्वती पूजन करताना सर्वात आधी देवीला शेंदूर आणि इतर श्रृंगार सामुग्री अर्पित करावी. 
 
यानंतर फुलांची माळ अर्पित करावी.
 
संगीताच्या क्षेत्रात असल्यास वाद्य यंत्रांची पूजा करावी आणि अध्ययनाशी संबंधित असल्यास सर्व विद्या सामुग्री जसे लेखणी, पुस्तकं, वह्या यांची पूजा करावी.
 
शक्य असल्यास देवीला मोरपीस अर्पित करावं.
 
अंगणात रांगोळी काढावी.
 
आम्र मंजरी देवीला अर्पित करावी.
 
वासंती खीर किंवा केशरी भाताचा नैवदे्य दाखवावा.
 
स्वत: केशरी, पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
फुलांनी सरस्वती देवीची पूजा करुन श्रृंगार करावे.
 
देवी शारदाची आरती, सरस्वती मंत्राने आराधन करावी.
 
पिवळ्या तांदळाने ॐ लि‍हून पूजा करावी.
 
देवी सरस्वती मंत्र : श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा
 
गोडाचा नैवदे्य दाखवून सरस्वती कवच पाठ करावा. देवी सरस्वतीची पूजा करताना हे मंत्र जपल्याने असीम पुण्य प्राप्ती होते-
 
सरस्‍वती देवी श्‍लोक
ॐ श्री सरस्वती शुक्लवर्णां सस्मितां सुमनोहराम्।।
कोटिचंद्रप्रभामुष्टपुष्टश्रीयुक्तविग्रहाम्।
वह्निशुद्धां शुकाधानां वीणापुस्तकमधारिणीम्।।
रत्नसारेन्द्रनिर्माणनवभूषणभूषिताम्।
सुपूजितां सुरगणैब्रह्मविष्णुशिवादिभि:।। वन्दे भक्तया वन्दिता च...