शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (11:35 IST)

अत्यावश्यक प्रवर्गात हि दुकाने सामील, आदेशात बदल

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे वरुन पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. अशात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आदेशात बदल केला आहे व काही दुकानांना अत्यावश्यक प्रवर्गात सामील केलं आहे.
 
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या तसंच पावसाळ्यासाठी बांधकामांची गरज लक्षात घेता सुरक्षिततेसाठी बांधकाम साहित्यांशी संबंधित दुकाने आणि व्यवसायाचाही अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आदेशात बदल करण्यात यते असून बदलत असलेल्या मोसमाप्रमाणे लागणारे साहित्य जसे रेनकोट, छत्र्या, प्लॅस्टिक शिट्स तसंच या संबंधित व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
 
नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी आवश्यक साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु राहतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या गरजेप्रमाणे बांधकाम व्यवसायाशी संबंधित दुकाने व व्यवसाय अत्यावश्यक सेवेत देण्यात आलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु ठेवू शकतात, असे देखील सांगण्यात येत आहे.
 
ही सूट देण्यात येत असली तरी सर्वांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असून उल्लंघन केल्यास व्यक्तीला किंवा संस्थेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असून पुढील सूचना येईपर्यंत दुकाने बंद ठेवावी लागतील.